उच्चार

Dec 26th, 2023

नागरी, उच्च-वर्गीय समाजात एक अशी जात उद्भवली आहे जिला पाश्चात्य वस्तू आणि पदार्थांच्या नावांच्या योग्य उच्चरांचे असीम ज्ञान आहे (आणि असलेले ज्ञान पाडळण्याची असीम खाज आहे).

उदाहरणार्थ, जर कॉफी प्यायला गेलेले असताना कोणी “कापूसीनो” मागितले तर ह्या पंथातली मंडळी दुसऱ्या क्षणी उच्चरकाचा पाणउतारा करतील. टॅक्सी बोलावण्यासाठी कोणी “उबेर” उघडले तर हि लोक त्या होतकरू प्रवाश्याकडे “यूजर कसला, हा तर ड्रायव्हर बनण्याच्या लायचिका नाही” अश्या दृष्टीने बघतील.

त्या विपरीत, हि मंडळी नियमित रित्या स्थानिक शहरांची व खाद्यपदार्थांची नवे आपल्या असमर्थ कंठांतून आणि अशक्त जिभांनीं गैरउच्चारित करतात. “ठाणे” चे “थाने” होते, “पणजी” चे “पानाजी”, आणि “पुरणपोळी” ची “पुरनपोली”.

एका हीन अश्या लेखनपद्धतीवरती आधारित असलेल्या किचकट भाषेच्या (अर्थात लॅटिन लिपी वर आधारित इंग्लिश भाषेच्या) विचित्र नियमांच्या ज्ञानावरून स्वतःचे सामाजिक वर्चस्व ठरवण्याची हि वृत्ती फार पसरली आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे.